Last Updated: Wednesday, November 9, 2011, 15:06
झी २४ तास वेब टीम, सिंधुदुर्ग 
कोकणात नारायण राणे विरुद्ध भास्कर जाधव यांच्यातल्या वादामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हमरीतुमरीवर आले असल्यानं पोलिसांनी सिंधुदुर्गात आंदोलन करण्यास मनाई केली. सिंधुदुर्गात राणेंना यापुढं जशास तसं उत्तर देऊ, असा आवाज राणेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीनं दिला, तर राणे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना नेहमीच्या स्टाईलमध्ये बजावलं.
चिपळूणात सुरु झालेल्या राणे-जाधव वादाचे पडसाद सिंधुदुर्गात उमटले आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेला मालवणी मुलुख पुन्हा अशांत झाला. राष्ट्रवादीनं पुतळे जाळून पेटवलेल्या आंदोलनाला राणे समर्थकांनी दगडफेकीनं उत्तर दिलं आणि सिंधुदुर्गाचे पोलीसही धास्तावले. अखेर आंदोलनांनाच मनाई करून पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण राणेंविरोधात राष्ट्रवादी मात्र आक्रमकच आहे....
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीनं आवाज देताच राणे समर्थकही उसळले. प्रत्युत्तर दिलंत तर नेस्तनाभूत करू असा दमच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भरला. यापुढे जिल्ह्यात काँग्रेसबरोबर आघाडी करणार नाही अशी घोषणा करून निवडणुकीच्या रणमैदानातही राष्ट्रवादीनं आव्हान दिलं. या वादानंतर आता राणेही सिंधुदुर्गात परतले. दोन्ही बाजूंकडून आव्हान प्रतिआव्हान दिलं जात असल्यानं निवडणुकीआधी सिंधुदुर्गात परंपरागत धूमशान पहायला मिळेल अशी चिन्हं दिसतात.
First Published: Wednesday, November 9, 2011, 15:06