नेरळमध्ये नक्षलवाद्याचे घर - Marathi News 24taas.com

नेरळमध्ये नक्षलवाद्याचे घर


 www.24taas.com, नेरळ
 
३ मार्च रोजी डोंबिवलीतून चार नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यातील असीनकुमार भट्टाचार्य याचे नेरळमध्ये घर असल्याचे उघड झालं आहे. या घरातून नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा होत होता.
 
गडचिरोली पोलिसांनी नेरळ येथील या घरावर धाड टाकून घर सील केलं आहे. या घरात बंदूक बनवण्याचं साहित्य आढळून आलं. लेथ मशीनही या घरात आढळून आली. असीनकुमार १९९५ ते २००७ दरम्यान या घरात राहिला होता. त्यानंतर तो डोंबिवलीत राहण्यासाठी आला.
 
३ मार्च रोडी नक्षलवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून डोंबिवलीतून चार संशयितांना अटक करण्यात आली होती. यात दोन महिलांचाही समावेश होता. एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या चौघांना अटक करण्यात आली होती. संशयितांकडून कम्प्युटर आणि काही प्रमाणात रोकड जप्त करण्यात आले होते. गेल्या काही काळापासून नक्षलवाद्यांना मदत पुरविल्याचा आरोप या चौघांवर लावण्यात आला होता.

First Published: Friday, March 9, 2012, 12:18


comments powered by Disqus