सेनेची जैतापूर विरोधात संपर्क यात्रा - Marathi News 24taas.com

सेनेची जैतापूर विरोधात संपर्क यात्रा

www.24taas.com, रत्नागिरी
 
जैतापूर अणू उर्जा प्रकल्पाविरोधात शिवसेना परत एकदा रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेने आज त्यासाठी जनसंपर्क यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलक या यात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. रत्नागिरीतून सकाळी ११ वाजता या रॅलीला सुरुवात होईल आणि रात्री ९ वाजता ती धरताळे येथे पोहचेल.
 
जनसंपर्क यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातून जादा पोलिस कुमक मागवण्यात आली हे. तसंच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांनाही तैनात करण्यात आलं आहे.
 
 

 
 

First Published: Sunday, March 11, 2012, 15:54


comments powered by Disqus