Last Updated: Wednesday, March 14, 2012, 16:08
www.24taas.com, रायगड रायगडचे उपजिल्हाधिकारी नितीश ठाकुरांकडे ११८ कोटींचं घबाड सापडलंय. ठाणे लाचलुचपत विभागानं २६ ठिकाणी जप्तीची कारवाई सुरु केली आहे. मुंबईसह कोकणभर ठाकूरची काळी माया पसरलीय.
त्याच्या कुटुंबियांविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. यामध्ये नितीश ठाकूर, पत्नी मीनल, आई छाया, भाऊ निलेश यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. हे गेल्या ६ महिन्यांपासून ते सीक लिव्हवर आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६ ठिकाणच्या बेनामी मालमत्तेवर छापे टाकण्यात आलेत.
First Published: Wednesday, March 14, 2012, 16:08