ठाण्यात दोन जोडप्यांची आत्महत्या - Marathi News 24taas.com

ठाण्यात दोन जोडप्यांची आत्महत्या

www.24taas.com, ठाणे
 
ठाण्यातल्या ओवळा गावामध्ये दोन जोडप्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हे दोन युवक आणि दोन युवती छत्तीसगडचे रहिवासी होते.
 
गेल्या महिन्याभरापासून हरवल्याची तक्रार छत्तीगडच्या पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मृत युवतींच्या गळ्यात मंगळसूत्र आढळून आलं आहे. त्यामुळे प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या करण्यात आली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ठाण्यातल्या ओवळा गावात हे चौघेजण राहत होते.
 
मात्र काल घराचा दरवाजा बंद असल्याचं लक्षात आल्यानंतर घरमालकाला संशय आला. त्यानंतर त्याने दरवाजा उघडल्यानंतर या चौघांनी गळफास लावल्याचं त्याला आढळून आलं. य़ा आत्महत्येशी कोणाचा संबंध नसल्याचे नमूद केलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. दरम्यान पोलिसांनी चारही मृतदेह सिविल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत.

First Published: Thursday, March 15, 2012, 09:34


comments powered by Disqus