नितीश ठाकूरकडे १८० नव्हे ३७५ कोटींचे घबाड! - Marathi News 24taas.com

नितीश ठाकूरकडे १८० नव्हे ३७५ कोटींचे घबाड!

www.24taas.com, अलिबाग
 
रायगडचा निलंबित उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याची मालमत्ता ३७५ कोटींहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोर्टात वकिलांनी तशी माहिती दिली आहे.
 
लाचलुचपत विभागानं केलेल्या कारवाईत मुंबई, अलिबाग परिसरात नितीश ठाकूरच्या २६ हून अधिक मालमत्तेवर छापे घातले होते. यात नितीश ठाकूरकडे १८० कोटींची काळी माया असल्याचं काल सांगण्यात आलं होतं.
 
मात्र नितीश ठाकूरकडे १८० नव्हे तर तब्बल ३७५ कोटींची मालमत्ता असल्याचं कोर्टात सांगण्यात आलय. कोर्टानं नितिश ठाकूरला २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिलीय.
 

नितीश ठाकूर यांची संपत्ती


*  ठाण्यात जमीन
*  बोरिवलीमध्ये गोराई परिसरात बंगला
*  विलेपार्लेतील स्वप्नशील बिल्डिंगमध्ये ड्युप्लेक्स फ्लॅट
*  अंधेरीतील इष्टदेव बिल्डिंगमध्ये फ्लॅट
*  दहा आलिशान गाड्या. यामध्ये ऑडी, रेंज रोव्हर, स्कोडा गाड्यांचा समावेश
*  मुरुडमध्ये जमीन तसंच शेअरलाईन नावाचं हॉटेल
*  अलिबागमध्ये सोमेश्वर बिल्डिंगमध्ये ४ फ्लॅट्स, पूजा अपार्टमेंटमध्ये २ गाळे, श्रुतीसारंग बिल्डिंगमध्ये ५ गाळे
*  कांदिवलीमधी व्हाईसरॉय कोर्टमध्ये १ फ्लॅट, सनसिटी बिल्डिंगमध्ये फ्लॅट
*  समतानगरमध्ये प्रकल्प कार्यालय
 
नितीश ठाकूर यांच्यावर खंडणीच्या आरोपाखाली गुन्हे शाखेने त्यांच्यावर केली होती. त्यानंतर २०११मध्ये त्यांना नोकरीतून निलंबित करण्यात आलं होतं.
ठाकूर १९८८ ते २०१० या काळात वेगवेगळ्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांनी तब्बल ११८ कोटींची संपत्ती जमा केली, असा लाचलुचपत विभागाचा आरोप आहे.
या प्रकरणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु होती. कोर्टाने ठाकूर यांच्या संपत्तीची चौकशी करण्याचा आदेश दिल्यानंतर लाचलुचपत विभागाने आज ही कारवाई केली.

First Published: Thursday, March 15, 2012, 18:58


comments powered by Disqus