Last Updated: Sunday, March 18, 2012, 09:22
www.24taas.com, पोलादपूर 
रायगडमध्ये दरोड्यांचं सुरूच आहे. पोलादपूर तालुक्यातील लोहारमल इथं एका दाम्पत्यावर दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली आहे. गेल्या सहा महिन्यातली ही 12 वी घटना आहे. मोहन पवार यांच्या घरावर पहाटे 3 च्या सुमारास हा सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी पवार आणि पत्नीवर कुदळीनं वार केले. या हल्ल्यात ते जबर जखमी असून त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.गेल्या दोन महिन्यांतील ही १२वी घटना आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून दरोड्यांचे सत्र चालू आहे. रायगडमध्ये महाडजवळील बिरवाडीत सुतार यांच्या घरावर 25 फेब्रुवारीच्या पहाटे चारच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. हा हल्ला इतका धाडशी होता की, दरोडेखोरांच्या हल्ल्यात १४ वर्षांची मुलगी शिवानी हिची निघृण हत्या करण्यात आली. तर प्रतिकार करणारे अन्य चार जण गंभीर जखमी झालेत. दरम्यान घरातील एकूण किती ऐवज चोरीला गेला आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
First Published: Sunday, March 18, 2012, 09:22