फेसबुकवरची तू तू मै मै अन् रस्त्यावर हाणामारी - Marathi News 24taas.com

फेसबुकवरची तू तू मै मै अन् रस्त्यावर हाणामारी

www.24taas.com, डोंबिवली
 
'फेसबुक' सध्या तरूणाईतच नाही सर्व वयोगटात प्रचंड लोकप्रिय आहे या सोशल नेटवर्किंग साईटवर चँटींग करण्याचं अनेकांना जणू व्यसनच जडलय. डोंबिवलीत, कोपरमधे स्थानिक शिवसेना नगरसेवक रामदास पाटिल याचा मुलगा सचिन पाटिल याने  मित्र लोकेश पावशे आणि त्याच्या परिवाराला फेसबुकवरील चँटिंगवरून वादविवाद झाल्याने आपल्या साथिदारांसह बेदम मारहाण केली आहे.
 
या मारहाणीत लोकेश आणि त्याच्या भावाला गंभीर दुखापत झाली असुन 13 टाके पडले आहेत मात्र विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करत चालढकल चालवली आहे.

First Published: Monday, March 19, 2012, 20:24


comments powered by Disqus