मनसेची राष्ट्रवादीला साथ, सेनेवर करणार मात - Marathi News 24taas.com

मनसेची राष्ट्रवादीला साथ, सेनेवर करणार मात

www.24taas.com, ठाणे
 
ठाणे झेडपीतही मनसेनं शिवसेनेला दणका दिला आहे. त्यामुळं ठाणे  झेडपीत राष्ट्रवादीचा अध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाला आहे. ६६ सदस्यांच्या झेडपीत बहुमतासाठी ३४ सदस्यांची गरज आहे. राष्ट्रवादीकडं २७ सदस्य आहेत. तर काँग्रेसचा एक आणि मनसेचे दोन असे ३० सदस्यसंख्या होते.
 
गेल्यावेळी कम्युनिस्ट आणि बहुजन विकास आघाडीही राष्ट्रवादीसोबत होते. कम्युनिस्टांचे ४ आणि बहुजन विकास आघाडीचे ३ सदस्य राष्ट्रवादीला मदत करु शकतात. त्यामुळं राष्ट्रवादीचं संख्याबळ ३७ वर जाऊ शकतं.
 
राष्ट्रवादीचा अध्यक्ष सहजपणे निवडून येऊ शकतो. नाशिकमध्ये शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेमुळं मनसे संतापली आहे. त्यामुळं ठाणे महापालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीतही मनसेनं आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेत शिवसेनेला दणका दिला आहे. त्यानंतर झेडपीतही शिवसेनला दणका बसण्याची शक्यता आहे.
 
 
 

First Published: Tuesday, March 20, 2012, 11:46


comments powered by Disqus