रिक्षाचालकांची मुजोरी तर वाढतेच आहे... - Marathi News 24taas.com

रिक्षाचालकांची मुजोरी तर वाढतेच आहे...

www.24taas.com, नवी मुंबई
 
नवी मुंबईत भाडेकपातीच्या विरोधात रिक्षाचालकांचा संप तिसऱ्या  दिवशीही सुरूच आहे. आज दुपारी १२ वाजता याबाबत रिक्षा संघटनांची राज्याच्या सचिवांसोबत बैठक होणार आहे.
 
या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मात्र सलग तिसऱ्या दिवशीही संप सुरूच असल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. शाळेत जाण्याच्या वेळेलाच आणि नागरिकांच्या ऐन ऑफिसला जाण्याच्या वेळीच रिक्षावाल्यांकडून अडवणूक सुरू आहे.
 
दरम्यान NMT कडून जादा बसेसची सोय करण्यात आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईतल्या जवळपास ९५ टक्के रिक्षा या सीएनजीवर चालतात. भाडं मात्र पेट्रोल दराप्रमाणं आकारलं जात होतं. आता सीएनजीप्रमाणे भाडं आकारायला आरटीओनं परवानगी दिली आहे. त्यामुळं रिक्षाचं भाडं १५ रुपयांवरुन ११ रुपये करण्यात आलं आहे.
 
 

First Published: Thursday, March 22, 2012, 12:00


comments powered by Disqus