रायगडात सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा - Marathi News 24taas.com

रायगडात सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा

www.24taas.com, अलिबाग
 
 
रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगरमध्ये सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकण्यात आला आहे.  पेशवेकाळीन मंदिरातून दरोडेखोरांनी दीड किलो वजनाची सोन्याची मूर्ती पळवलीय. दोन वॉचमनला मारहाण करून हा दरोडा रात्री घालण्यात आला.
 
 
दरोडेखोरांनी मूर्तीच्या अंगावर असलेले दागिनेही  लांबविलेत. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेलं हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. मात्र याच मंदिरावर दरोडा पडल्यानं भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात ही घटना आहे. सुवर्ण गणेश मंदिरात चोरी करताना चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांना मारहाण करून सोन्याची मूर्ती पळविली . पळवलेल्या या मूर्तीची किंमत ६० लाख आहे.  या मूर्तीचे वजन दीड किलो आहे.
 
 
रायगड जिल्ह्यात चोरीच्या घटनांत वाढ होत आहे. या महिन्यातील हि चौथी घटना आहे. पोलिसांचे दुर्लक्ष आणि आर. आर. पाटील यांना राज्याचे गृहखाते संभाळता येत नसल्याने चोऱ्यांच्या घटनांत आणि दरोड्यांमध्ये वाढ झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
 
व्हिडिओ पाहा..

First Published: Monday, April 2, 2012, 12:43


comments powered by Disqus