Last Updated: Thursday, March 29, 2012, 09:52
www.24taas.com, दिवे आगार 
शिवसेनेनं आज रायगड बंदची हाक दिली आहे. दिवे आगार येथील सुवर्ण गणेश मूर्ती चोरी प्रकरणी शिवसेनेनं पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात प्रतिसाद मिळतो आहे. पहाटेपासूनच रिक्षा, मालवाहतूक बंद आहेत. अनेक ठिकाणी बाजारपेठाही बंद आहेत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी गणेश मंदीराला भेट दिली होती.
तावडे यांनी राज्यभरातील गणेश मंदीरात घंटानाद करण्याचा इशारा दिला होता. तर शिवसेनेनं आज रायगड बंदची हाक दिली आहे. शनिवारी मंदीरातल्या सोन्याच्या गणेश मूर्तीची चोरी झाली होती. सहा दिवस झाले तरी दरोडेखोर पकडले गेले नसल्यानं संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे.
पेशवेकाळीन मंदिरातून दरोडेखोरांनी दीड किलो वजनाची सोन्याची मूर्ती पळवली होती. दोन वॉचमनला मारहाण करून हा दरोडा रात्री घालण्यात आला होता ज्यात एकाचा मृत्यू झाला होता. दरोडेखोरांनी मूर्तीच्या अंगावर असलेले दागिनेही चोरले होते. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेलं मंदिर भाविकांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. मात्र याच मंदिरावर दरोडा पडल्यानं भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
First Published: Thursday, March 29, 2012, 09:52