Last Updated: Friday, March 30, 2012, 08:06
www.24taas.com, ठाणे अपघातात ५० टक्के भाजलेल्या रुग्णाला चक्क हॉस्पिटलबाहेर काढल्याचा धक्कादाक प्रकार ठाण्यातल्या जिल्हा रुग्णालयात घ़डला आहे. दुस-या एका रुग्णाला जागा हवी आहे म्हणून भाजलेल्या रुग्णाला चक्क हॉस्पीटलबाहेर काढल्याचं कारण देण्यात आले.
प्रकाश शिंदे असं या रुग्णाचं नाव आहे. एका अपघातात त्यांचं शरीर पन्नास टक्के भाजलय. नऊ दिवसांपासून शिंदे यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यानंतर गुरुवारी अचानक दुस-या रुग्णाला जागा हवी आहे म्हणून त्यांना प्रशासनानं हॉस्पिटलबाहेर काढलं. वेदनांनी विव्हळणा-या शिंदेंकडे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष गेलं. सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यंमांच्या प्रतिनिधींच्या कानावर ही बाब घातली.
प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर प्रकाश शिंदे यांना तातडीनं रुग्णालयात घेण्यात आले. शिंदे यांनी केसपेपरसाठी लागणारे पाच रुपये भरले नसल्यानं त्यांना बाहेर ठेवल्याचं अजब कारणही पुढं करण्यात आले आहे.
First Published: Friday, March 30, 2012, 08:06