Last Updated: Saturday, March 31, 2012, 15:47
www.24taas.com, नवी मुंबई नवी मुंबईत महामुंबई बिल्डर वेलफेअर असोसिएनकडून प्रॉपर्टी एक्झिबिशन भरवण्यात आल आहे. या प्रदर्शनात 8 लाखांपासून १ कोटीपर्यंतचे फ्लॅट उपलब्ध करुन देण्यात आलयं. खास मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांसाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
स्वप्नातील घराचा शोध घेणा-यांसाठी नवी मुंबईत खास प्रॉपर्टी एक्झीबिशन भरवण्यात आलयं. महामुंबई बिल्डर वेलफेअर असोसिएशनकडून भरवण्य़ात आलेल्या प्रदर्शनात 8 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंतची घरं उपलब्ध करुन देण्यात आलीये. मध्यम आणि उच्चमध्यमवर्गियांना केंद्रस्थानी ठेवून हे प्रदर्शन भरवण्यात आलयं. वनरुम किचन, वनबीएचके, टू आणि थ्री बीएचकेच्या पर्यायांमध्ये देखील घरं उपलब्ध आहेत.
नवी मुंबईतल्या पनवेल कामोठे, वाशी या भागातील सत्तर बांधकाम व्यावसायिकांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवलाय. यावर्षी प्रदर्शनातून दीडशे कोटींचा व्यवसाय होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. एक एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. घरं विकत घेणा-या हजारो इच्छुकांचा यंदाही उदंड प्रसिसाद लाभेल असा विश्वास आयोजकांना आहे.
व्हिडिओ पाहा...
First Published: Saturday, March 31, 2012, 15:47