Last Updated: Saturday, March 31, 2012, 18:43
www.24taas.com, रायगड दिवेआगरमधल्या सुवर्ण गणेश मंदिरात चोरीच्या घटनेचा अजून तपास लागलेला नाही. त्यानंतर गावात इतर काही महत्त्वाच्या मंदिरांना सुरक्षा देण्यात आलीय. त्यात रुपनारायण मंदिराला सुरक्षा देण्यात आली आहे. हजारो वर्षांपुर्वीच्या रुपनारायण मंदिरात दुर्मिळ शिल्प आहे.
हजार वर्षांची परंपरा असणाऱ्या रुपनारायण मंदिराला जांभा दगडाचा हा नवा साज चढवला जातोय. गेली पाच वर्ष संथपणे हे काम सुरु आहे. मंदिरातल्या रुपनारायणाची मूर्ती आहे. सुवर्ण गणेश मंदिरातल्या चोरीनंतर या मंदिराच्या सुरक्षेकडे प्रशासनाचं लक्ष गेलं. सध्या सुरक्षेसाठी एक कॉन्स्टेबल ठेवण्यात आलाय.
प्राचीन वस्तूंचा ठेवा मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यात आहे. मात्र तो जतन करावी अशी मानसिकताच नाही. सुवर्ण गणेश मूर्ती चोरीला जाऊन आठवडा उलटला. सुरक्षिततेची खबरदारी घ्यायची तेव्हा घेतली गेली नाही. पुरातन अशा रुपनारायण मंदिराला जुजबी का होईना सुरक्षा देण्यात आलीय.
First Published: Saturday, March 31, 2012, 18:43