Last Updated: Saturday, March 31, 2012, 22:17
www.24taas.com, ठाणे मीरा भाईंदर महापालिकेनं कोर्टाच्या आदेशानंतर एका अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवलाय. भाईंदर नवघर रोडवर अनधिकृतपणे व्यायामशाळा बांधली होती.
दोन इमारतींमधील लोकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग बंद करून ही व्यायामशाळा बांधण्यात आली होती. प्रशांत यादव यानं या व्यायामशाळेचं बांधकाम केलं होतं. वारंवर तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं अखेर रहिवाशांनी कोर्टात धाव घेतली.
कोर्टानं याप्रकरणी कारवाईचे आदेश दिल्यानंतर महापालिकेनं या व्यायामशाळेवर हातोडा फिरवलाय. या व्यायामशाळेमागे एका मनसे नगरसेवकाचा हात असल्याचंही सांगण्यात येतय.
First Published: Saturday, March 31, 2012, 22:17