Last Updated: Tuesday, April 3, 2012, 16:59
www.24taas.com, ठाणे 
ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडून वेगळा गट स्थापन करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी विभागीय आयुक्तांकडे केलेली मागणी फेटाळण्यात आल्यानंतर पुन्हा आयुक्तांकडे अपिल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
काँग्रेसला वेगळा गट स्थापन करण्यास मान्यता देण्यासाठी काँग्रेस नेत्यांचा आयुक्तांवर दबाव असल्याचं बोललं जातं आहे. ठाण्यात स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी शिवसेनेला मदत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
तर काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ही भेट स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर घेण्यात आली होती. त्यामुळे ठाण्य़ात स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी वेगळी राजकीय समीकरणं उदयाला येत आहेत. पण आता काँग्रेसही राष्ट्रवादीला धक्का देण्याचा विचारात आहे असेच दिसून येते...
First Published: Tuesday, April 3, 2012, 16:59