ठाणे स्थायी समिती निवडणूक रेंगाळलेलीच - Marathi News 24taas.com

ठाणे स्थायी समिती निवडणूक रेंगाळलेलीच

www.24taas.com, ठाणे
 
ठाण्यातील महापौर निवडणूकीची रणधुमाळी संपली तरी अजून स्थायी समितीची निवडणूक रेंगाळली आहे. त्यातच सत्ताधारी शिवसेना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीला समसमान पाठिंबा आहे.
 
मात्र आता आघाडीतील तणावामुळे मुख्यमंत्र्यांची प्रदेशाध्यक्षांसह ठाण्यातील नेत्यांसोबत बैठक झाली. यावेळी स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा द्यायचा की नाही यावर योग्य वेळी निर्णय घेण्याचे आदेश स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आमच्या सोबत दगाफटका करणार नाही तसाच शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी होणार नसल्याचा दावा राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी केलाय.
 
पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समिती सदस्य पदाच्या सर्वसाधारण सभेत निर्णय होणार असला तरी ऐन वेळेस काँग्रेस काय भूमिका घेते तसचं भाजप देखील आपली भूमिका स्पष्ट करेल यावर सदस्याची निवड होईल. समान सदस्य विजयी झाले तर मात्र चिठ्ठी टाकून त्यापुढील सर्वसाधारण सभेत सभापती निवडला जाईल.

First Published: Thursday, April 5, 2012, 08:55


comments powered by Disqus