Last Updated: Saturday, April 7, 2012, 09:22
www.24taas.com, नालासोपारा नालासोपाऱ्यात एका सोनसाखळी चोराला लोकांनी चांगलाच चोप दिला आहे. इथल्या उमराळा गावात गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
उमराळा गावात चर्चमधील प्रार्थना संपल्यानंतर महिला घरी जात होत्या त्याच वेळी दोन साखळी चोरांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र आणि सोन्याचा हार काढला. चोर पळण्याच्या तयारीत असतांनाच महिलांनी आरडाओरड केली. त्याचवेळी चोरांची बाईक स्लिप झाली आणि एक चोर लोकांच्या हाती लागला. त्यानंतर त्याची चांगलीच धुलाई करण्यात आली.
दुसरा सोनसाखळी चोर मात्र मंगळसूत्र आणि सोन्याचा हार घेवून फरार झालाय. जखमी चोराला बोरीवलीच्या भगवती रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या संदर्भात पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.
First Published: Saturday, April 7, 2012, 09:22