बहिणीलाच विकण्याचा भावाचा प्रयत्न? - Marathi News 24taas.com

बहिणीलाच विकण्याचा भावाचा प्रयत्न?

www.24taas.com, ठाणे
 
 
ठाण्यीतील  लोकमान्यगर भागात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. सख्या भावाने पैशाच्या मोहापायी बहिणीलाच विकण्याचा घाट घातल्याचे उघड आले. परराज्यात फिरायला जाऊ असे सांगून भावाने गुजरातमधील एका ३५ वर्षीय तरूणाशी १४ वर्षीय बहिणीचा विवाह लावण्याचा प्रकार उघटकीस आला. हे सर्व पैशाच्या लोभापाई झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी मुलीच्या भावासह चौघांना अटक केली आहे. तर आठ जणांविरूद्ध गुन्हा वर्तकनगर पोलिसांनी केला आहे.
 
 
१४ वर्षीय मुलीचा भाऊ दीपक गाडेकर (२५), वहिणी वनिता गाडेकर (२५), भावाच्या मित्राची पत्नी आशा माळी (२५) आणि कमल फसले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर राजू माळी याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान,  १४ वर्षीय बहिणीला १७ जानेवारी २०१२मध्ये गुजरातमध्ये नेले. १७ मार्चला पालमपूर गावातील एका मंदिरात दिनेश माळी या ३५ वर्षीय तरूणाबरोबर तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले.
 
 
 
लग्नानंतर दिशेन हा लैंगिक त्रास देत असल्याची तिने माहिती दिली. त्यानंतर दीपक आणि वनिता यांनी त्या मुलीला घेऊन ५ एप्रिल रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार वर्तकनगर पोलिसांनी तपाशाची चक्रे फिरवली. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली.  यानंतर दीपक आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. तसंच दिनेश माळी या लग्न लावून दिलेल्या तरुणाचा आणि त्याच्या आई-वडिलांचा पोलीस शोध घेत असून एक टीम गुजरातला रवाना झाली आहे.
 
 
मुलीला उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं आहे.मात्र, हा विवाह पैशाच्या मोहामायी लावून देण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या दिशेने पोलीस तपास करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. दिनेश आणि त्याच्या आईवडिलांकडून ६० हजार रूपये घेऊन लग्न लावून दिल्याचे मुलीने म्हटले आहे. त्यामुळे पैशाचा संशय बळावला आहे.
 
 
 
 

First Published: Tuesday, April 10, 2012, 14:59


comments powered by Disqus