पनवेलमध्ये काँग्रेसविरूद्ध महायुती - Marathi News 24taas.com

पनवेलमध्ये काँग्रेसविरूद्ध महायुती

झी २४ तास वेब टीम,पनवेल
 
पनवेल नगरपालिकेच्या ३८ जागांसाठी काँग्रेस विरूद्ध शेकाप-शिवसेना आणि रिपाइं यांच्या महायुतीत थेट लढत अपेक्षित आहे. काँग्रेसनं शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरले.
 
पनवेल नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये बिघाडी झालीय. या निवडणुकीसाठी शेकाप आणि शिवसेना यांची महायुती झालीय. राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं गाव असल्यानं पनवेल पालिका आपल्याच ताब्यात राहण्यासाठी सर्वच पक्षांचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन उमेदवारी अर्ज भरले. काँग्रेस यावेळी सर्व ३८ जागा स्वबळावर लढवत आहे.
 
 
काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळे लढत असले तरी महायुतीतही आलबेल नाही. शेकाप-शिवसेना-रिपाइं आघाडीतून भाजप बाहेर पडलय. शेकाप २४ तर शिवसेना १२जागा लढवणार आहे. एका जागेवरून भाजपनं वेगळी चुल मांडलीय.
 
राष्ट्रवादीही स्वबळावर लढणार आहे. त्यामुळं पनवेलमध्ये सगळेच पक्ष आपली ताकद आजमावण्याच्या प्रयत्नात आहेत. मनसेनं १४जागा लढवणार असल्याचं जाहीर केलय. त्यामुळं पनवेलचा सुभा आपल्याच ताब्यात रहावा यासाठी सगळेच पक्ष इरेला पेटलेत.

First Published: Wednesday, November 23, 2011, 05:03


comments powered by Disqus