Last Updated: Saturday, April 14, 2012, 20:34
www.24taas.com, भिवंडी रविवारी होत असलेल्या भिवंडी महापालिका निवडणुकीपुर्वी क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत बनावट व्होटींग कार्ड आणि रेशनिंग कार्ड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. सात जणांची टोळी जेरबंद करण्यात आलीय.
1 काँप्युटर, 1 लॅपटॉप, लेझर प्रिंटर आणि चार मतदार याद्या जप्त करण्यात आल्यात. तसंच 1 हजार 161 फोटो जप्त करण्यात आलेत. तसंच निवडणूक आयोगाची 47 चिन्हं सापडलीत. 310 बोगस ओळखपत्रे जप्त करण्यात आलीत. ही टोळी कुठल्या पक्षाशी कीवा उमेदवाराशी संबंधित आहे काय याचा तपास सुरु आहे. भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीपुर्वीच कारवाई झाल्यानं खळबळ उडालीय.
First Published: Saturday, April 14, 2012, 20:34