Last Updated: Sunday, April 15, 2012, 17:27
www.24taas.com, भिवंडी 
भिवंडीतल्या फेनापाडा भागात मतदान दरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये वाद झाला. यात दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तसंच भाजपचा बुथही तोडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
शिवसेनेचे कमलाकर पाटील आणि भाजपच्या श्याम अग्रवाल यांच्यात वाद झाला. या दोघांमध्ये चुरशीची लढत होते आहे. त्यामुळे भिवंडीच्या निवडणुकिला गालबोट लागलं आहे. भिवंडी निवडणूकित राडा होऊ नये म्हणून अत्यंत चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भिवंडी महापालिकेसाठी मतदान हे शांततेत सुरू होतं. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी झालेली नाही तसचं महायुतीही नाही. त्यामुळं नवी समीकरणे काय असतील याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. मात्र आता सेना आणि भाजप यांच्यातच वाद झाल्याने पुढे काय होणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
First Published: Sunday, April 15, 2012, 17:27