मुंबईचे चौघे मुसई धरणात बुडाले - Marathi News 24taas.com

मुंबईचे चौघे मुसई धरणात बुडाले

www.24taas.com, ठाणे
 
 
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका परिसरातील मुसई धरणात  सुटी एन्जॉय करण्यासाठी गेलेले चौघे बुडाले. हे चौघे मुंबईतील भेंडीबाजारमधील राहणारे आहेत.
 
 
रविवार असल्याने सुटीची मजा लुटण्यासाठी मुंबईतून १५ जणांचा ग्रुप मुसई धरणावर मौजमजा करण्यासाठी गेला होता.  दुपारी जेवण झाल्यानंतर पोहण्यासाठी सर्वजण धरणात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने सायंकाळी ४.३० ते ४.४५ वाजण्याच्या दरम्यान यातील चार जण बुडाले. काही मित्रांनी आरडाओरडा केला. परंतु त्यांना वाचविण्यात यश आले नाही. बुडालेल्यांपैकी दोघांचे मृतदेह सापडले तर दोघे जण बेपत्ता आहेत.
 
 
बुराउद्दीन लोखंडवाला (४०),  इस्माईल उज्जैनवाला (३२), मारिया हकिमभाई मंडपवाला (११), फरीदा इस्माईल उज्जैनवाला (११) हे बुडालेत. यापैकी मारिया आणि बुराउद्दीन  यांचे मृतदेह सापडले. बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

First Published: Monday, April 16, 2012, 09:13


comments powered by Disqus