कल्याणमध्ये चोरांचा सुळसुळाट - Marathi News 24taas.com

कल्याणमध्ये चोरांचा सुळसुळाट


झी २४ तास वेब टीम, कल्याण
 
शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना या वाढतच आहे. त्यामुळे शहरातील नागरिक चिंतेमध्येच आहेत. अशीच एक घटना आज कल्याण शहरात घडली. कल्याणच्या रामानंद चौक परिसरात चार अज्ञातांनी महेश वर्मा यांचा रस्ता अडवून त्यांच्याकडची बॅग पळवून नेल्याची घटना घडली.
 
त्यांच्या बॅगमध्ये कलेक्शनच्या एक लाख 45 हजारांची रोकड होती. भर दिवसा, भर रस्त्यात चार जणांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्याजवळची बॅग खेचून ते पसार झाले. मात्र, त्यातल्या दोघांना परिसरातील लोकांनी धाडस दाखवून पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र भरदिवसा असे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी चिंताही व्यक्त केलीये

First Published: Thursday, November 24, 2011, 17:19


comments powered by Disqus