Last Updated: Thursday, April 19, 2012, 22:42
www.24taas.com, ठाणे ठाणे महानगर पालिकेत काँग्रेस-शिवसेनेनं हातमिळवणी करून विरोधी पक्षनेतेपदापासून राष्ट्रवादीला दूर ठेवलंय. राष्ट्रवादीची संख्या जास्त असताना विरोधी पक्षनेतेपती काँग्रेसच्या मनोज शिंदेंची नियुक्ती करण्यात आलीय.
गेले काही दिवस एकत्र आलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेनं राष्ट्रवादीला झटका दिला. उद्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होण्याआधी काँग्रेस-शिवसेनेनं एकत्र येऊन राष्ट्रवादीला धक्का दिलाय.
ठाणे महापौरपद निवडणुकीच्या काही तास आधी राज ठाकरेंनी आपले पत्ते उघड केले आणि ठाण्यात शिवसेनेचा महापौर बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पळवापळवी आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीत आपणच किंगमेकर असल्याचं राज ठाकरेंनी दाखवून दिलं आणि मनसेच्या स्थापनेनंतर प्रथमच शिवसेनेला थेट पाठिंबा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे तब्बल ७३ मतं मिळवून शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील विजयी झाले होते.
मात्र, नाशिकमध्ये सेनेने मनसेची साथ दिली नव्हती. ठाण्यातल्या राजकारणाला नवे रंग चढत असल्याचं आत्तापर्यंत दिसून आलं आहे. त्यात शिवसेना- काँग्रेसची हातमिळवणी ही आणखी एक धक्कादायक युती मानली जात आहे.
First Published: Thursday, April 19, 2012, 22:42