सेना-NCP नगरसेवकांची पालिकेत राडा - Marathi News 24taas.com

सेना-NCP नगरसेवकांची पालिकेत राडा

www.24taas.com, ठाणे
 
आज ठाणे महानगरपालिकेत एकच राडा झाला. कारण की, सेना - राष्ट्रवादी नगरसेवक ह्यांनी मोठ्या प्रमाणात हाणामारी करावी लागली. शेवटी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. पोलिसांनी मध्ये ही हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरसेवक एकमेंकांना अक्षरश: गुंडांसारखे मारत होते.
 
ठाणे महापालिकेतल्या विरोधी पक्षनेता निवड प्रक्रियेविरोधात राष्ट्रवादी कोर्टात जाणार आहे. तर पक्षाच्या आदेशानंच विरोधी पक्षनेतेपदाचा दावा केल्याची माहिती विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या मनोज शिंदे यांनी दिली आहे. ठाणे महापालिकेतल्या विरोधीपक्षनेतेपदावरुन सुरु झालेली सभागृहाबाहेरची धुसफुस आता सभागृहात पोहोचल्याचं चित्र आज पहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये हाणामारीही झाली.
 
निव़डणुकीनंतर ठाणे महापालिका ही अंतर्गत वादासाठीच जास्त गाजू लागली आहे. त्यातच आता ठाणे महापालिकेतला सभापतीपदसाठीचा सत्तासंघर्ष विकोपाला गेला. आजच्या महासभेत राष्ट्रवादी आणि मनसेचे नगरसेवक काळ्या फिती लावून सभागृहात आले. महासभेत गोंधळ घालत महापौराना घेराव घालण्यात आला. वाढलेल्या गोंधळामुळे अखेर महासभा तहकूब करण्यात आली.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांसोबत  काँग्रेसचे एक नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनीही पक्षाच्या भूमिकेचा निषेध करीत काळी फित लावून सभागृहात प्रवेश केला. शिवसेना आणि काँग्रेसनं केलेली ही राजकीय खेळी पक्षातल्याच लोकांना आवडलेली दिसत नाही.
 
 

 
 
 
 
 

First Published: Friday, April 20, 2012, 16:11


comments powered by Disqus