Last Updated: Saturday, April 21, 2012, 17:03
www.24taas.com, नवी मुंबई नवी मुंबईतील खारघरमधील अधिराज सोसायटीमध्ये आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलींची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब तिसऱ्या दिवशी उघडकीस, आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खारघरमधील अधिराज सोसायटीमध्ये कौटुंबिक कलहातून आईनेच हे कृत्य केल्याचे पुढे आले आहे. तीन दिवसानंतर घरातून दुर्गंधी आल्याने पाहणी केल्यानंतर मुलीच्या आईने स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकील आले आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलींपैकी एक मुलगी दोन वर्षांची आणि दुसरी आठ वर्षांची होती. या महिलेने आत्महत्या का केली यामागचे कारण समजून घेण्यसाठी खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हिडिओ पाहा
First Published: Saturday, April 21, 2012, 17:03