Last Updated: Sunday, April 22, 2012, 10:22
www.24taas.com, मुंबईमुंबईत मुलुंडमधील शाळेत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलयं. रात्रभर सापळा रचूनही बिबट्या जाळ्यात येत नव्हता. मात्र, अखेर पहाटे बिबट्या वनविभागाने ठेवलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अलगद अडकला.
मुलुंडमधल्या NES शाळेत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा बिबट्या खिडकीतून आत घुसला होता. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले, परंतु, त्यांना दिवसभर बिबट्या पकडण्यात यश आले नाही.
सुरक्षा रक्षकाला हा बिबट्या दिसला त्यानंतर त्याने शाळेच्या व्यवस्थापकांना त्याच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून हा बिबट्या आला, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
शाळेच्या बेसमेंटमध्ये असलेल्या एका गोदामामध्ये बिबट्या लपला होता असं वनअधिकाऱ्यांनी सांगितले.
First Published: Sunday, April 22, 2012, 10:22