रेल्वे तिकीट ऑफिस लुटण्याचा प्रयत्न - Marathi News 24taas.com

रेल्वे तिकीट ऑफिस लुटण्याचा प्रयत्न

www.24taas.com, कल्याण
 
कल्याण रेल्वे स्थानकातल्या तिकीट बुकिंग ऑफिसमध्ये घुसून काही अज्ञात इसमांनी कॅश लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी कॅशिअर राजेंद्र शर्मा यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केला.
 
यात शर्मा हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कल्याणच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काल रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली. मात्र लुटारूंनी हल्ला करताच आरडा ओरड झाल्यानं ते काहीही लुटू शकले नाही आणि त्यांना तिथून पोबारा करावा लागला.
 
पण त्यामुळेच पुन्हा एकदा रेल्वेचा सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. रेल्वेचा सुरक्षा ही गेले काही दिवस जास्त ढिसाळ झालेली आहे. काल रात्रीच नांदेड येथे ट्रेनवरवर देखील जबर असा दरोडा पडला होता.
 
 
 

First Published: Monday, April 23, 2012, 11:58


comments powered by Disqus