पतीला अटक, सासू, सासऱ्यांविरूध्द गुन्हा - Marathi News 24taas.com

पतीला अटक, सासू, सासऱ्यांविरूध्द गुन्हा

www.24taas.com, नवी मुंबई
 
 
नवी मुंबईतील खारघरमधल्या महिलेच्या आत्महत्त्येप्रकरणी तिचा पती प्रशांत वहाळला अटक केली आहे. सासू, सासरे आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
आठवडाभरापूर्वी समिधा वहाळ या महिलेनं तिच्या आठ आणि दीड वर्षांच्या दोन मुलींची गळा चिरून हत्या केली होती. त्यानंतर तिनही गळफास घेवून आत्महत्या केली होती. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर ही बाब उघड झाली होती. पती आपल्याला वेळ देत नाही म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचं समिधानं आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवलं होते.
 
 
संबंधित बातमी
 
मुलींची हत्या करून आईची आत्महत्या

मुलींची हत्या करून आईची आत्महत्या
नवी मुंबईतील खारघरमधील अधिराज सोसायटीमध्ये आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलींची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब तिसऱ्या दिवशी उघडकीस, आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First Published: Monday, April 23, 2012, 15:37


comments powered by Disqus