Last Updated: Tuesday, April 24, 2012, 10:36
www.24taas.com, अंबरनाथ 
अंबरनाथमध्ये नगरसेवकांचे बनावट स्टॅम्प आणि लेटरहेड तयार करणारी टोळी नगरसेवकानेच पकडून दिली आहे. उल्हासनगरचे शिवसेना नगरसेवक प्रधान पाटील यांच्या नावाचे बनावट लेटरहेड बनविले जात होते.
लेटरहेड, रहिवासी दाखला आणि विशेष कार्यकारी अधिकारी पदाचे स्टॅम्प तयार करुन बडोदा बँकेत खातं उघडण्यासाठी गेलेल्या प्रकाश अहुजा आणि ईश्वर पाटील या दोघांना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पकडलं. ज्या छिकाणी हे दोघं बनावट स्टँम्प आणि लेटरहेड बनवत होते त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी धडक दिली असता त्या ठिकाणी आणखी दोन नगरसेवकांच्या नावाची बनावट स्टॅम्प आणि लेटरहेड सापडली.
त्यानंतर प्रधान पाटील यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांकडे या दोघांनी आपल्या गुन्हाची कबुली दिली असून धक्कादायक बाब म्हणजे गेल्या एक वर्षापासून अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण भागात ही टोळी सक्रीय होती.
First Published: Tuesday, April 24, 2012, 10:36