दिवा स्टेशनवर गोळीबार, एकाचा मृत्यू - Marathi News 24taas.com

दिवा स्टेशनवर गोळीबार, एकाचा मृत्यू

www.24taas.com, दिवा
 
ठाण्यातील दिवा स्टेशनवर भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. सुमित म्हात्रे असं या नागरिकाचं नाव आहे. शुल्लक वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येतं आहे.
 
आरोपी आणि मृत नागरिक यांचा दुकानाचा वाद होता. त्यातच आज दिवा स्टेशनवरील रेल्वे क्रॉसिंगवर कार पुढं नेण्यावरुन वाद झाला. या वादातूनच ब्रम्हा यांनी स्वतःजवळच्या बंदूकीतून सुमित म्हात्रेवर गोळ्या झाडल्या.
 
गोळीबारात जखमी झालेल्य़ा सुमित म्हात्रेंचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. तर गोळीबार करणाऱ्या ब्रह्मा म्हात्रेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भरदिवसा हा खून करण्यात आल्याने दिवा परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.
 
 
 

First Published: Tuesday, April 24, 2012, 14:37


comments powered by Disqus