Last Updated: Saturday, April 28, 2012, 10:19
www.24taas.com, मुंब्रा भारनियमनाची वेळ बदलण्यात यावी या मागणीसाठी मुंब्र्यातील रहिवास्यांचं आंदोलन तीव्र करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कौसा येथील महावितरणच्या कार्यालयात घुसून स्वतःचेच कपडे काढून निषेध व्यक्त केला.
आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा प्रयत्नही केला. या आंदोलनादरम्यान काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती. पोलीसांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अटक केली आहे. तर यासंदर्भात दोन दिवसांमध्ये निर्णय देण्यात येईल, असं आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
First Published: Saturday, April 28, 2012, 10:19