चांदींची मूर्ती गाभाऱ्यात बसणार? - Marathi News 24taas.com

चांदींची मूर्ती गाभाऱ्यात बसणार?

www.24taas.com, दिवेआगर 
 
दिवेआगर येथील चोरीला गेलेली मुर्ती मिळू शकली नाही अशा परिस्थितीत असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेला देवाचा गाभारा रिकामा राहु नये यासाठी पुण्यातील जितेंद्र घोडके सराफ यांनी त्यांच्याकडील गणपतीची मुर्ती दिवेआगरला भेट म्हणून देणार आहेत.
 
घोडके सराफ यांनी दिड वर्षांपूर्वी बनवलेली ही मुर्ती दिवेआगरच्या मुळ मुर्तीची प्रतिकृती आहे. मुळ मुर्तीच्या वजनाइतकच म्हणजे १३२० ग्रॅम वजन या मुर्तीचं आहे.
 
मुळ मुर्ती सोन्याची असली तरी ही प्रतिकृती चांदीची असून त्यावर सोन्याचा वर्क चढवण्यात आला आहे. मुर्ती घेवून ते दिवेआगरकडे निघाले आहेत. आज ग्रामसभेनंतर त्या मुर्तीबाबत निर्णय घेण्यात आहे.
 
 
 

First Published: Thursday, May 3, 2012, 18:36


comments powered by Disqus