ग्रामसभा उधळली, बाप्पा राहिले अधांतरी... - Marathi News 24taas.com

ग्रामसभा उधळली, बाप्पा राहिले अधांतरी...

www.24taas.com, भारत गोरेगावकर, दिवेआगर
 
दिवेआगरमध्ये नवीन गणेशमूर्तीच्या निर्णयासाठी बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत जोरदार गोँधळ झाला आहे. मंदिराचे विश्वस्त मंडळाचे सदस्य या ग्रामसभेला अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे विश्वस्त मंडळ अनुपस्थित का? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
 
ग्रामसभेला विश्वस्तच अनुपस्थित राहिल्याने गावकऱ्यांनी ग्रामसभाच उधळली. त्यामुळे जोपर्यंत विश्वस्त मंडळ येणार नाही. तोवर ग्रामसभा होणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. तसचं 'झी २४ तास'चे पत्रकार भारत गोरेगावंकर यांना लाईव्ह वृत्तांकन करण्यास ग्रामस्थांनी मनाई केली. त्यामुळे आता ग्रामसभेसाठी जोपर्यंत विश्वस्त येणार नाही. तोपर्यंत कोणताच निर्णय होणार नाही. आणि आज या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
 
दिवेआगरच्या गणेशमूर्तीच्या स्थापनेप्रकरणी ग्रामसभा सुरू झाली आहे. पुण्यातील सराफ जितेंद्र घोडके यांनी सुवर्ण गणेश मंदिरातील गणेशमूर्तीप्रमाणेच हुबेहुब चांदीची मूर्ती तयार केली होती. ती त्यांनी दिवेआगर मंदिरात देण्याची इच्छा व्यक्त केली. या मूर्तीला २४ कॅरेट सोन्याचा मुलामा देण्यात आला. मात्र ही मूर्ती मंदिरात स्थापित करावी का? याबाबतचा निर्णय ग्रामसभेत होणार होता. मात्र ही मूर्ती बसवण्यापूर्वी मान्यवर गुरूजी आणि भाविकांची मतंही विचारात घेतली जाणं आवश्यक आहे. त्यामुळं आजच्या ग्रामसभेकडेच सगळ्यांच लक्ष लागून राहिलं होतं.
 
 
 
 
 

First Published: Thursday, May 3, 2012, 16:42


comments powered by Disqus