दिवेआगरमध्ये नवे बाप्पा, नवं मंदिर - Marathi News 24taas.com

दिवेआगरमध्ये नवे बाप्पा, नवं मंदिर

www.24taas.com, दिवेआगर 
 
दिवेआगरमध्ये गणेशाची मूर्ती सोन्याचीच बसवण्यात येणार आहे. लोकसहभागातून ही मूर्ती बसवण्याचा निर्णय झाला आहे. सुवर्ण गणेशाच्या जागेवरच ही नवी मूर्ती बसवण्यात येईल. 'झी २४ तास'ने सर्वप्रथम  हीच  भूमिका मांडली होती. लोकसभेतून बाप्पांची सोन्याची मूर्ती तयार करण्यात यावी. आणि त्यानंतरच दिवेआगर ग्रामस्थांनी देखील हाच निर्णय घेतला आहे.
 
तसंच नवीन मंदिरही बांधण्याचा निर्णय झाला आहे. दिवेआगर ग्रामस्थ आणि विश्वस्तांच्या बैठकीमध्ये हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसंच सध्याचं विश्वस्त मंडळ बरखास्त करुन नवं मंडळ स्थापन करण्यात येणार आहे.
 
दिवेआगरमध्ये काही दिवसापूर्वी नवीन गणेशमूर्तीच्या निर्णयासाठी बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत जोरदार गोँधळ झाला होता. मंदिराचे विश्वस्त मंडळाचे सदस्य या ग्रामसभेला अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे विश्वस्त मंडळ अनुपस्थित का? असा सवाल ग्रामस्थांनी केला होता.
 
 
 

First Published: Sunday, May 6, 2012, 17:20


comments powered by Disqus