Last Updated: Tuesday, May 8, 2012, 18:06
www.24taas.com, मुंबई मे महिना उजाडला तरी रत्नागिरी हापुसचे दर अजुनही सर्वसामान्यांना न परवडणारे आहेत. रत्नागिरी हापूस खरेदी करणा-यांना डझनामागे सातशे ते आठशे रुपये मोजावे लागत असल्यानं ग्राहकांसोबतच विक्रेतेही अडचणीत आलेत.
रत्नागिरी हापूस विकणाऱ्यांच्या ठेल्यासमोर मे महिना उजाडला तरी एखाद-दुसराच ग्राहक दिसतोय. कारण एक डझन आंबे 700 ते 800 रुपयांना विकले जातायत. त्यामुळे ते खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय. रत्नागिरीच्या हापूस आंब्याला गेल्या 5 वर्षांपासुन चढ्या दराचं ग्रहण लागलंय आणि याहीवर्षी 40 टक्केच आंबा पिकाचं उत्पादन झालंय.त्यामुळे ग्राहकांना आंबा खावासा वाटला तरी परवडत नाहीये.
आंब्याच्या तीन महिन्याच्या हंगामात विक्री करुन पुढच्या पूर्ण वर्षांची बेगमी करणाऱ्या किरकोळ विकेत्यांना आंब्याच्या या चढ्या दराचा फटका बसतोय.
First Published: Tuesday, May 8, 2012, 18:06