Last Updated: Tuesday, November 29, 2011, 10:55
झी २४ तास वेब टीम, सिंधुदुर्ग पणजीहून पुण्याला जाणारी लक्झरी बस सिंधुदुर्गातील कणकवलीजवळ गड नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली. यात 32 प्रवासी जखमी झालेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे.
रात्री एक ते दोनच्या सुमारास बसला हा अपघात झाला. जखमींवर ओरोस ग्रामीण रुग्णालय आणि गोव्यातल्या हॉस्पिटलमध्येही उपचार सुरू आहेत. अपघातानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि जखमींना मदत करण्यास सुरुवात केलीय.
First Published: Tuesday, November 29, 2011, 10:55