Last Updated: Thursday, May 10, 2012, 19:27
www.24taas.com, मुंबई विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात सत्तारुढ आघाडी विरोधात एकच उमेदवार देण्याच्या विरोधकांच्या हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादीने अनिल तटकरे यांना उमेदवारी दिलीय. त्यांच्या विरोधात शिवसेनेनं उमेश शेट्ये यांना उमेदवारी दिलीय तर शेकापकडून राजेंद्र पाटील हे उमेदवार आहेत.
तटकरे यांच्या उमेदवारीला आव्हान देणारा अर्ज जिल्हाधिका-यांनी फेटाळून लावल्यावर आता एकास एक उमेदवार उभा केल्यास या मतदारसंघात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे आघाडीने निवडणूकीला एकदिलाने सामोरे जायची तयारी चालवलीय. नाशिक आणि परभणीत काँग्रेसनं तर लातूरमध्ये राष्ट्रवादीनं माघार घेतलीय.
First Published: Thursday, May 10, 2012, 19:27