ठाकरेंचा इनकम सोर्स काय? – राणे - Marathi News 24taas.com

ठाकरेंचा इनकम सोर्स काय? – राणे

www.24taas.com, भाईंदर
 
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या टक्केवारीवर जगत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांचा इनकम सोर्स काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
 
भाईंदर इथल्या जॉगर्स पार्क च्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बीजेपी आणि राष्ट्रवादीवरही टीका केली.  राणे यांनी यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीवरही टीका केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं ५०-५० चालले आहे, असे सांगत काँग्रेसच्या मतावर राष्ट्रवादी निवडून आल्याची आठवण त्यांनी करून दिली.
 
नारायण राणे  म्हणाले, उद्धव ठाकरे यांचं इनकम काय? यांचा बिझनेस काय असं सांगत सामना पेपर लॉसमध्ये जात असताना उद्धव ठाकरे मर्सडिजमध्ये कसे फिरतात, बाहेरगावी कसे जातात. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं५०-५० चाललं आहे. आपणच त्यांना ५०-५० ने निवडणून देता आणि जर तुम्ही आम्हाला पूर्ण निवडून दिलत तर आम्ही त्यांना उभं पण करणार नाही. राणे यांच्या टिकेला उद्धव काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.
 
 
व्हिडिओ पाहा..
 

First Published: Saturday, May 12, 2012, 11:38


comments powered by Disqus