हॉस्पिटलने नाकारले, महिलेची प्रसुती ट्रेनमध्येच - Marathi News 24taas.com

हॉस्पिटलने नाकारले, महिलेची प्रसुती ट्रेनमध्येच

www.24taas.com, कल्याण
 
केडीएमसीच्या गलथन कारभाराचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. डिलीव्हरीसाठी पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या महिलेला सायन हॉस्पटलमध्ये पाठवण्याचा सल्ला दिला गेला.
 
मात्र तिला अँम्ब्युलन्समधून पाठवण्यात आलं नाही. अखेर लोकलनं कल्याण स्टेशन सोडताच तिची प्रसुती झाली. सहप्रवासी महिलांनी ही प्रसुती केली. महिलांनी लोकलची चेन ओढून गाडी थांबवली.
 
त्यानंतर पुन्हा त्या महिलेला केडीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. केडीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये वारंवार रूग्णांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रूग्णांचे अतोनात हाल होतात.
 
 
 

First Published: Sunday, May 13, 2012, 13:04


comments powered by Disqus