Last Updated: Tuesday, March 12, 2013, 09:10
www.24taas.com, ठाणे ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दोन गटाच्या हाणामारीत हॉस्पिटलचीच तोडफोड केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलंय.
या घटनेमध्ये तीन जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्याच्यावर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील ‘मेन्टल हॉस्पिटल’ परिसरात एका परिवाराच्या हळदी समारंभाचा कार्यक्रम होता, त्यावेळी जुन्या वादावरून दोन गटामध्ये भांडण होऊन हाणामारी झाली. त्यामधील जखमींना सिव्हील इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले.
दोन्ही गटातील जखमींना एकाच इस्पितळामध्ये उपचारासाठी आणले होते आणि ते समोरासमोर आल्याने पुन्हा वाद पेटला. त्यातून तोडफोड झाली. दरम्यान, रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरा गरजेचा असल्याची मागणी होत आहे.
First Published: Tuesday, March 12, 2013, 09:10