ठाण्याचा पारा वाढलाय, पक्षी हैराण, Thane heat problems

ठाण्याचा पारा वाढलाय, पक्षी हैराण

ठाण्याचा पारा वाढलाय, पक्षी हैराण
www.24taas.com, झी मीडिया,ठाणे

पारा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. ठाण्यामध्ये जवळपास ४० डिग्रीपर्यंत तापमान गेलंय.याचा मोठा फटका मुक्या पशू पक्ष्यांवर होताना दिसतोय.

अन्न-पाण्याविना मुक्या जीवांचे हाल होतायत. उष्माघातामुळं अनेक पशू पक्षी जखमी होतायत. अशाप्रकारे जखमी झालेल्या मुक्या जीवांवर ठाण्याच्या SPCA हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. इथं जवळपास ५० ते ६० पशू पक्ष्यांवर उपचार सुरु आहेत. यांत मांजर ससा, कुत्री, गाढव,बकरी यासारखे प्राणी आहेत.


हॉस्पिटलमध्ये त्यांना थंड ठिकाणी ठेवून भरपूर खाद्य आणि पाणी देण्यात येतं. सलाईन आणि औषधं देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येतायत. सध्या उन्हामुळं सा-यांच्या अंगाची लाही लाही होते.अशावेळी पशू पक्षीसुद्धा अपवाद नाहीत. त्यामुळं आपणही या मुक्या जीवांसाठी आपल्या बाल्कनीत, अंगणात पाणी आणि खाण्याच्या वस्तू ठेवू शकता.. त्यामुळं मुक्या जीवांना दिलासा मिळेल.

First Published: Sunday, May 12, 2013, 10:13


comments powered by Disqus