Last Updated: Tuesday, December 17, 2013, 09:51
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेएका सीनियर केजीमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यावर शाळेच्या शिपायानंच अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातल्या नामवंत सरस्वती विद्यालय या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घडलाय.
घरी आल्यानंतर या मुलाच्या गुप्तअंगामध्ये दुखू लागल्यानंतर त्यानं आपल्या पालकांना हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी राबोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर मल्लेश तोपन्ना या शिपायाला पोलिसांनी अटक केली. २२ वर्षापासून मल्लेश सोनवणे शिपाई या पदावर काम करतो. वैद्यकीय चाचणीमध्ये देखील मुलावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाळेच्या प्रसाधन गृहामध्येच हा सर्व प्रकार घडल्यानं आता शाळेमध्येच मुलं सुरक्षित नसल्यानं पालक चांगलेच धास्तावलेत. सरस्वती विद्यालय हि ठाण्यातील जुनी आणि नामवंत शाळा असून या शाळेमध्ये असा प्रकार घडल्याने पालकवर्गामध्ये मुलांच्या सुरक्षेवरून वरून भीतीचे वातारवण आहे. सोमवारी काही पालकांनी सुरक्षेविषयी विचारणा देखील केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 17, 2013, 09:38