Last Updated: Saturday, August 25, 2012, 23:16
www.24taas.com`ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन` पुन्हा राजकीय वादात अडकलीय. ही मॅरेथॉन पालिकेची नसून शिवसेनेची असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर सर्वच पक्षाच्या नेत्यांना यात सहभागी करून घेत असल्यानं होणारा आरोप चुकीचा असल्याचा दावा महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी केलाय.
`ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन`साठी पालिकेनं 52 लाखांची तरतूद केलीय. मागील वर्षीपेक्षा त्यात 27 लाखांनी वाढ करण्यात आलीय. या मुद्यावरून महासभेत गोंधळही झाला होता. शहरातल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत, याकडे विरोधकांनी लक्ष वेधलंय. स्पर्धेसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीतून रस्ते बुजवावे असा सल्लाही विरोधकांनी दिलाय.
मॅरेथॉनमधून खेळाडूंना प्रेरणा मिळावी, नवे खेळाडू तयार व्हावे हा या मागचा उद्देश आहे. राजकारणामुळे मूळ उद्देश बाजूला पडत असल्याचं चित्र आहे. मात्र महापौरांनी सर्वच पक्षाच्या नेत्यांना मॅरेथॉनमध्ये सहभागी करून घेत असल्याचं सांगतानाच, राजकारणाचा आरोप फेटाळून लावला. सत्ताधारी आणि विरोधकांनी या मॅरेथॉनकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहण्याऐवजी खेळाडूंना यातून जागतिक दर्जाचा अनूभव कसा मिळेल ? याकडे पाहण्याची अधिक गरज आहे.
First Published: Saturday, August 25, 2012, 23:16