Last Updated: Monday, April 22, 2013, 16:23
www.24taas.com, ठाणेठाण्यातील घोडबंदर रोडवरच्या ग्रीन हिल इमारतीत मध्यरात्री दहा संशयित उतरल्याची माहिती तिथल्या रखवालदारांनी पोलिसांना दिलीये.
मध्यरात्री सुमो गाडीतून सहा, तर झेन गाडीतून चार संशयित उतरले. या बंद इमारतीत गेले. त्यांनी काळे कपडे घातले होते. पाठीवर बॅग लटकावल्या होत्या, अशी माहिती या रखवालदारांनी स्थानिक पोलिसांना दिलीये. पोलिसांनी सकाळी पाच वाजल्यापासून या सर्व इमारतींमध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरु केलं असून ठाणे पोलिसांसहित QRTच्या कमांडोंनी या इमारतीची तपासणी केली.
पोलिसांना तिथे संशयित असं काहीच आढळलेलं नाही. तरीही पोलिसांनी या तीनही रखवालदारांना चौकशीसाठी बोलावून घेतलंय. दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रत्येक नाक्यावर नाकाबंदी केलीय. प्रत्येक हॉटेल, लॉजची चेकिंग सुरु आहे. तसंच पोलिसांनी ठाणेकरांना अलर्ट राहण्यास सांगितलंय, तसंच कोणीही संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितलय.
First Published: Monday, April 22, 2013, 16:21