ठाण्यात कुत्र्याला धडक दिल्यानं स्कूलबसची तोडफोडThane - school bus hit dog, that`s why School bus to

ठाण्यात कुत्र्याला धडक दिल्यानं स्कूलबसची तोडफोड

ठाण्यात कुत्र्याला धडक दिल्यानं स्कूलबसची तोडफोड
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

ठाण्यातले माजी नगरसेवक रामभाऊ फडतरे यांच्या पाळीव कुत्र्याला स्कूलबसची धडक लागली. त्यात तो कुत्रा जखमी झाला. त्यामुळं संतापलेल्या फडतरेंच्या कार्यकर्त्यांनी रॅम्बो स्कूलच्या दोन बसेस फोडल्या.

केवडा सर्कल परिसरात ही घटना घडलीय. यावेळी बसमध्ये विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून या बस फोडण्यात आल्या.

दरम्यान, रामभाऊ फडतरे यांनी बस फोडणारे कार्यकर्ते आपले नसल्याचं झी मीडियाशी बोलतांना सांगितलंय. त्यातला एकही कार्यकर्ता माझा असल्याचं सिद्ध झाल्यास गुन्हा नोंदवा, असंही फडतरे म्हणाले आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 13, 2014, 14:22


comments powered by Disqus