अनधिकृत इमारतीच्या बळींची संख्या ४५ वर..., thane shilfata illegal building collapse

अनधिकृत इमारतीच्या बळींची संख्या ४५ वर...

अनधिकृत इमारतीच्या बळींची संख्या ४५ वर...
www.24taas.com, ठाणे

ठाण्यात शिळफाट्याजवळ सात मजली बिल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या ४५ वर पोहचलीय तर जखमींचा आकडा ७० वर गेलाय.

घटनास्थळी गुरुवारी रात्रभर मदत आणि बचावकार्य सुरु होतं. मुंबई महापालिकेची टीम इथं मदतीसाठी दाखल झालीय. आज संध्याकाळपर्यंत ढिगारा उपसण्याचं काम सुरू राहील. महत्त्वाचं म्हणजे, महिन्यांपूर्वी या अनधिकृत इमारतीचं बांधकाम केवळ तीन महिन्यात आटोपण्यात आलं होतं. केवळ तीन महिन्यांत हे काम पूर्ण झालंच कसं, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांनी दिली होती. त्याप्रमाणे बिल्डरसहीत आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बिल्डिंगचा बिल्डर फरार झालाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दोन चिमुकल्यांनी केली मृत्यूवर मात
दुसरीकडे या भीषण अपघातात सापडलेल्या दोन चिमुकल्यांनी मृत्यूवरही मात केलीय. दोन लहान मुलांना वाचवण्यात बचाव यंत्रणेला यश आलंय. या दोघांनाही ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. यापैंकी एक साडेचार वर्षाचा तर दुसरा पाच वर्षाचा मुलगा आहे.

First Published: Friday, April 5, 2013, 07:46


comments powered by Disqus