Last Updated: Sunday, February 23, 2014, 10:16
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेठाण्याची शान समजला जाणारा सॅटीस प्रोजेक्ट, त्याच्या आजूबाजूचे स्कायवॉक सध्या प्रेमी युगुलांचे अड्डे बनलेत. त्यामुळे ठाणेकर वैतागलेत.
सॅटीसवर पोलीस किंवा चौकीदार नेमण्याची ठाणेकरांची मागणी आहे. मात्र पालिकेकडून या तक्रारीची दखल घेतली जात नाही.
ठाणे स्टेशन परिसरात उभ्या राहीलेल्या या सॅटीस पुलामुळे तसंच त्याला जोडणा-या स्कायवॉकमुळे ब-याच प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न सुटायला मदत झाली.
मात्र आता या प्रोजेक्टचे साई़ड इफेक्टसही दिसायला लागलेत.
सॅटीस, स्कायवॉक आणि जनपथ या तीनही ठिकाणांचा उपयोग कपल स्पॉट म्हणूनही होत आहे.
या ठिकाणी प्रेमी युगुलं दिसणं आता नित्याचं झालंय. तसंच तरूण तरूणींचे ग्रुप गप्पाटप्पा करण्याचेही हे अड्डे बनलेत. त्यामुळे पादचा-यांना त्रास होतो.
या ठिकाणी चौकीदार असावा किंवा पोलिसांनी या ग्रुपना आणि प्रेमी युगुलांना अटकाव करण्याची ठाणेकरांची मागणी आहे.
पालिकेकडेही ही मागणी वारंवार कऱण्यात आली. मात्र पालिका या समस्येकडे फारशा गांभीर्याने लक्ष देत नाहीये.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, February 23, 2014, 10:16